Tuesday, 20 August 2013

Group discussion on Seed production of Sorgham by KVK Sagroli

इक्रीस्य।ट  आणि महाबीज यांच्या सहकार्याने रबी ज्वार बिजोत्पादन कार्यक्रम 

        हैद्राबाद येथील आंतरराष्ट्रीय ईक्रिस्याट आणि महाबीज यांच्या सहकार्याने बीजोत्पादन कार्यक्रम सगरोळी आणि परिसरात कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे . यासाठी सगरोळी आणि आताकली या गावांची निवड करण्यात आली आहे- त्यासाठी शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात येत आहेत. दिनांक १६ ऑगष्ट रोजी सगरोळी येथे माणिकप्रभू मंदिरात  शेतकऱ्यांशी चर्चा संपन्न झाली. अध्यक्ष म्हणून गावचे उपसरपंच श्री सुनील देशमुख होते . 
       सर्वप्रथम संक्रिती संवर्धन मंडळ चे संस्थापक कै . बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ . सुरेश कुलकर्णी यांनी सर्व शेतकऱ्यांचे स्वागत केले आणि बिजोत्पादन कार्यक्रमाबाबत माहिती दिली . डॉ  गजानन ढगे  यांनी जनावरांना लागणारा चारा आणि त्याची प्रत याविषयी विस्तृतपणे माहिती दिलि. श्री. कपिल इंगळे यांनी ज्वारी पिकाच्या उत्पादकता, क्षेत्र, लागवड पद्धती बाबत विस्तृतपणे मांडले. बिजोत्पादन करण्यासाठी लागणारे Isolation चे अंतर,  पेरणीची पद्धती विविध जाती, लागवडीनंतर घ्यावयाची काळजी. इत्यादी माहिती दिली.  श्री. प्रवीण देशपांडे यांनी ज्वारी पिकावरील विविध रोग व किडी बाबत विस्तृत माहिती दिलि. 
        डॉ . दत्ता म्हेत्रे यांनी शाशकीय स्तरावरील विविध योजना यांची माहिती देऊन पीक विमा, गटाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या विविध सुधारित औजाराचा  वापर करावा असे आवाहन केले.
अध्यक्षीय समारोपात उपसरपंच श्री सुनील देशमुख यांनी  हैद्राबाद येथील आंतरराष्ट्रीय ईक्रिस्याट आणि महाबीज यांच्या सहकार्याने बीजोत्पादन कार्यक्रम आपल्या गावात राबविण्यात येत असल्याबाबत कृषी विज्ञान केंद्राचे आभार मानून शेतकर्यांनी याचा पुरेपूर फायदा घ्यावा असे आवाहन केले. श्री व्यंकट शिंदे यांनी आभार मानले. 

No comments:

Post a Comment